Wednesday, March 25, 2026
spot_img
spot_img

12 तारखेला विलीनीकरणाबाबत बोलेल; रोहित पवारांनी स्पष्टच सांगितलं

एक नजर महाराष्ट्र न्युज                                       बारामती :

रोहित पवार यांनी मुंबईत दोन महत्त्वाच्या पत्रकार परिषदांची घोषणा केली आहे. 10 फेब्रुवारी रोजी ते अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात लोकांच्या मनात असलेल्या शंकांवर एक विस्तृत सादरीकरण करतील. या अपघाताबाबत अनेक प्रश्न अनुत्तरित असून, त्यांना उत्तरे मिळायला हवीत, अशी त्यांची भूमिका आहे. 12 फेब्रुवारी रोजी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) विलीनीकरणाबद्दल माहिती देणार आहेत. दादांची (अजित पवार) इच्छा काय होती, विलीनीकरण का अपेक्षित होते, याचे राजकीय आणि भावनिक पैलू ते समोर आणतील.

 

याशिवाय, रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या बॅनरवरील अजित पवारांच्या फोटोच्या वापरावरून सुरु झालेल्या टीकेवरही भाष्य केले. सुनेत्रा पवार यांच्या राजकीय भूमिकेबद्दल बोलताना, त्यांनी अजित पवारांची जागा कोणीही घेऊ शकत नाही असे म्हटले. मात्र, सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपद आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारावी, अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी व्यक्त केले. कुटुंबात अद्याप राजकीय चर्चा झालेली नाही, परंतु ९ ऑक्टोबरनंतर यावर विचार सुरू होऊ शकतो, असेही त्यांनी

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या